स्वीकृत नगरसेवक ॲड. प्रथमेश सोमन यांचा गावकरी चालक मालक संघटनेकडून सत्कार

प्रथमेश सोमन

पनवेल (शहर प्रतिनिधी गणेश पाटील) | पनवेल महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याबद्दल ॲडवोकेट प्रथमेश सोमन यांचा गावकरी चालक मालक संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष श्री. रेहमान सेठ, सरचिटणीस श्री. गणेश तु. पाटील, खजिनदार श्री. अशोक धोत्रे व सह खजिनदार श्री. बाळू निमसे यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी ॲड. प्रथमेश सोमन यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पनवेल शहराच्या विकासासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी कार्य करावे, अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाला संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here