नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान दीड लाख द्यावेच लागतील; बच्चू कडू यांची ठाम भूमिका

बच्चू कडू

नाशिक (उपसंपादक इंजि.कुबेर जाधव) । मेळघाटच्या प्रश्नांसाठी आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी उभे राहणारे आ. बच्चू कडू यांनी काढलेली मेळघाट संघर्ष यात्रा अखेर तात्पुरती स्थगित झाली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि प्रकाश अभितकर यांनी मध्यस्थी करत चर्चा घडवून आणली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दूरध्वनीवरून यात्रेतील जनतेशी संवाद साधून मागण्या लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर बच्चू कडू यांनी आंदोलन तात्पुरते मागे घेण्याचा निर्णय घेतला.परंतु या आंदोलनाचा मुख्य आणि कळिचा मुद्दा अजूनही तेवढाच जिवंत, तसेच चर्चेत आहे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, कर्जमाफीचे राजकारण आणि प्रामाणिक शेतकऱ्यांची उपेक्षा हा आहे.

महाराष्ट्रात अनेकदा सरकारे कर्जमाफी जाहीर करतात. थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत दिलासा दिला जातो. परंतु जे शेतकरी प्रामाणिकपणे वेळेवर कर्जफेड करतात, त्यांना केवळ ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देऊन समाधान मानण्यास सांगितले जाते. याच बाबतीत बच्चू कडू यांचे म्हणणे अगदी सुर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे की, जो शेतकरी प्रामाणिकपणे, कर्जफेड करतो, त्याला कमी का? त्याच्या वर अन्याय का? जर कर्ज न फेडणाऱ्यांना दोन लाख रुपयांची माफी मिळत असेल, तर पोटाला चिमटा काढून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान दीड लाख रुपये प्रोत्साहन अनुदान हे मिळायलाच हवे.

दीड लाखापर्यंत अनुदानाची मागणी का योग्य आहे
१) प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्याला न्यायाची अपेक्षा – नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आर्थिक शिस्त पाळतात. अशा शेतकऱ्यांना कमी प्रोत्साहन देणे म्हणजे प्रामाणिकपणालाच शिक्षा देणे ठरेल.
२) नियमित कर्जफेड करणाऱ्यांच्या मनात १००% संभ्रम निर्माण झाला आहे, जर थकबाकीदारांना जास्त फायदा आणि नियमित फेड करणाऱ्यांना कमी फायदा मिळाला, तर भविष्यात अनेक शेतकरी कर्ज टाळण्याचा विचार करू शकतात.तो त्यांनी का करू नये ?त्यामुळे बँकिंग व्यवस्था आणि अर्थव्यवस्थेलाही धोका निर्माण होईल अशी शंका उपस्थित केली जाते आहे.
३) आज दोन लाखा पर्यंत जरी कर्ज माफ झाले तर काही प्रमाणात ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण होण्यासाठी मदत होईल हे मान्य,,,त्याच बरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळाल्यास शेतकरी पुन्हा शेतीत गुंतवणूक करू शकतो, तसेच तो बियाणे, खत, सिंचन साधने यासाठी उपयोग होईल. त्यामुळे शेती उत्पादन वाढले तर ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होण्यासाठी.हातभार लागेल
४) सामाजिक न्यायाचा प्रश्न
कर्जमाफीचा उद्देश शेतकऱ्यांना दिलासा देणे हा असतो. पण दिलासा देताना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही समान न्याय मिळालाच पाहिजे, हीच बच्चू कडू, आणि खा, राजु शेट्टी यांची भूमिका आहे.या बाबतीत खा राजु शेट्टी यांनी दुरध्वनी वरुन बोलताना सांगितले की, जो शेतकरी पोटाला चिमटा काढून नियमित पिक कर्ज घेऊन त्याच्या आलेल्या उत्तपादनातुन परतफेड करतो,अशा शेतकऱ्यांना १००% प्रोत्साहन दिले पाहिजे, दोन लाखांच्या आतिल सर्व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी पेडलेल्या रकमेचा परतावा हा मिळालाच पाहिजे,तो त्यांचा हक्कच आहे,असं ठामपणे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here