चैत्र पौर्णिमेच्या यात्रेपुर्वी सा,बां विभागाने झुडपे काढावीत स्थानिक ग्रामस्थांची मागणी
नाशिक (उपसंपादक इंजि.कुबेर जाधव) । लोहोणेर , वसाका कारखाना ते विठेवाडी,भउर दरम्यान असलेल्या राज्य मार्गावरील कारखान्याच्या लगत असलेल्या दुभाजकात काही वर्षांपूर्वी शोची झाडी लावण्यात आली होती, परंतु कारखाना बंद असल्याने रस्त्यावर मध्यभागी लावलेल्या व वाढ झालेल्य झाडांमुळे ध्यानधारकांना दोन्ही बाजूंनी वहान चालवताना समोरचं काहीच दिसत नाही त्यामुळे अपघाताची शक्यता आहे,
तसेच कारखान्याच्या पुढे विठेवाडी कडे जाताना वाघदेव जवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपांमुळे दोन तीन ठिकाणी वळण रस्त्यावर झाडांमुळे समोरुन येणारे वहांन दिसत नाहीत त्यामुळे सरळ अंगावर येत आहेत तरी या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांनी त्वरित पहाणी करण्याची गरज आहे,
येत्या काही दिवसांत चैत्र पौर्णिमेच्या यात्रेला सुरुवात होईल, त्यामुळे पायी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पायी चालणे मुश्कील होते, तरी कारखाना ते विठेवाडी दरम्यान असलेल्या झांड तोडुन रस्ता मोकळा करून द्यावा , अन्यथा संबंधित विभागाने झाडी तोडली नाहीत तर शेजारील ग्रामस्थ स्वतः काटेरी झुडपे तोडून रस्त्यावर टाकतील व होणाऱ्या परिणामांना सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील याची नोंद घ्यावी,असा इशारा विठेवाडी चे माजी संरपंच, रावसाहेब निकम, सोसायटी मा चेअरमन कुबेर जाधव, धनाजी निकम, गणेश निकम,पिंटु निकम, लक्ष्मण निकम, सचिन निकम, संजय निकम यांनी दिला आहे.







