नाशिक (उपसंपादक इंजि.कुबेर जाधव) । स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती विठेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधिवत पूजा अंत्यंत साध्या पद्धतीने करून आरती करण्यात आली तसेच हिंदू धर्म तिथीनुसार शिवजयंती दि ६ मार्च रोजी साजरी करुन दुपारी चार वाजता विठेवाडी येथील राजमाता जिजाऊ उद्यान येथे लाल मातीत भव्य दिव्य कुस्त्याची दंगल स्थानिक शिवप्रेमी युवकांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली
यावेळी मालेगाव, चांदवड, धुळे सह कसमादे मधील नामवंत पहिलवानांनी हजरी लावली, यात काही तरुण कुस्तीगीर मुलिंचा ही समावेश होता, साडेचार वाजता सुरू झालेली कुस्त्यांची दंगल रात्री उशिरा पर्यंत सुरू होती, शेवटची मानाची कुस्ती मालेगाव व चांदवड येथील असलेल्या पहिलवानात झाली असता ती कुस्ती बरोबरीत सुटली व १०, हजार रुपयांचे बक्षीस विभागुण देण्यात आले, गावातील प्रतिष्ठित नागरिक व तरूणांचा सहभाग उल्लेखनीय होता,
यावेळी पंचायत समिती माझी सभापती बाळासाहेब निकम, सोसायटी चेअरमन पि डी निकम,मा, चेअरमन कुबेर जाधव, धनाजी निकम, रावसाहेब निकम, प्रविण निकम, किशोर निकम, ईस्वर निकम, करण निकम, योगेश निकम, अभिजित निकम, कैलास कोकरे, कमलेश निकम, सुनिल कोकरे, सचिन निकम, वसंत निकम, शिवाजी निकम, महेंद्र आहेर, संजय सावळे,जिभाउ बोरसे, काशिनाथ बोरसे,राजेंद्र सावळे, गणेश निकम, हंसराज बोरसे, रमेश निकम, संजय निकम, आदी सह शेकडो तरुण उपस्थित होते







