लोणावळा (प्रतिनिधी) । जागतिक महिला दिनानिमित्त शिक्षिकांचा अध्यक्षांच्या हस्ते सन्मान विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त प्रशालेतील महिला शिक्षिकांचा शाळा समिती अध्यक्ष श्री भगवानभाऊ आंबेकर यांच्या हस्ते सन्मान सोहळा संपन्न झाला.
८ मार्च जागतिक महिला दिन जगभर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने समाजातील विविध क्षेत्रांमध्ये नैपुण्य मिळवणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येतो. त्याच धर्तीवर प्रशालेतील महिला शिक्षिकांचा सन्मान सोहळा प्रशालेतील प्रकाश हॉलमध्ये आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्या प्रसारिणी सभेच्या नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर होते. त्याचबरोबर मंचावर प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, जेष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात आणि ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती अनुजा गोसावी उपस्थित होते.
मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशालेतील महिला शिक्षिकांचा सन्मान लेखनी देऊन करण्यात आला. सन्मान सोहळ्यानंतर शिक्षक मनोगते पार पडली. श्री संजय पालवे आणि श्री.विठ्ठल खेडकर यांनी महिला दिनाचे महत्त्व, महिला दिनाचा इतिहास आणि समाजामधील महिलांचे स्थान विशद केले. प्राचार्य श्री.सुहास विसाळ यांनी आपल्या मनोगता मधून महिला शिक्षिकांना शुभेच्छा दिल्या. श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी अध्यक्षीय मनोगताद्वारे प्रशालेतील महिलांच्या कार्याचे कौतुक केले. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी यांचे दाखले दिले.आयोजित सन्मान सोहळ्याला पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये आणि श्रीमती स्नेहलता कांबळे यांनी आभार मानले.
नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी आणि सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके यांनी महिला दिनानिमित्त प्रशालेतील महिला शिक्षिकांना आणि शिक्षकेतर महिला कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन समिती प्रमुख श्री.धनंजय काळे आणि श्री.योगेश कोठावदे यांनी केले. सूत्रसंचालन श्री.सोमनाथ ढूमणे, प्रास्ताविक श्री.अनिल खामकर तर आभार श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर यांनी मानले. चित्रकला शिक्षक श्री.महेश चोणगे आणि श्री.विक्रम शिंदे यांनी देशाच्या प्रथम नागरिक विद्यमान राष्ट्रपती श्रीमती द्रौपाती मुर्मू यांची प्रतिमा रेखाटली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक आणि शिकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.







