लोणावळा (प्रतिनिधी) । येथील विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान विभागातर्फे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. डॉ.सी.व्ही.रमण यांच्या गौरवानिमित्त 28 फेब्रुवारी दिवस भारतभर राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने प्रशालेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुंदर असे मॉडेल्स तयार केले आणि प्रयोगाविषयी माहिती, उपयोग प्रदर्शन पाहण्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना देण्यात आली. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशालेचे प्राचार्य श्री.सुहास विसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, पर्यवेक्षक श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, जेष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात, श्री.आदित्य तळपे आणि विज्ञान विषय शिकवणारे शिक्षक वृंद उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मॉडेल्स बनवण्यासाठी श्री.सुभाष क्षीरसागर (विज्ञान विभाग प्रमुख), श्री.दत्तात्रय सुरवसे, श्रीमती किरण मस्के, श्री.श्रीकांत म्हसकर, श्रीमती साई सर्जेराव, श्रीमती मनीषा जगताप, श्रीमती प्रियंका फाले, श्री.देविदास खेडकर आणि श्री.गणेश घारे (प्रयोगशाळा सहाय्यक) यांनी सहकार्य केले. नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह विजयजी भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले.







