यावल तालुक्यातील मूळ राहिवासी असलेल्या अमेरिकेतील अभियंताचे अपघाती निधन

  • जहाजावरील स्फोट अपघात.
  • मृतदेह भारतात आणणेसाठी लागले 10 ते 12 दिवस.

यावल (सुरेश पाटील) – तालुक्यातील सावखेडासिम येथील रहिवासी व अमेरीका येथे जहाजावर अभियंता म्हणुन कार्यरत असलेला २७ वर्षीय तरूणाचा अमेरीकेत अपघाती मृत्यू झाला. मयत तरूणाचे नांव आसिफ मो. हनिफ तडवी असे आहे.
१४ जुलै 2020 रोजी त्याचा जहावावर अपघात झाला होता. तर गेल्या आठवड्यात उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.व रविवारी.२३ ऑगस्ट 2020 रोजी त्याचा मृतदेह भारतात आणण्यात आला असुन रात्री अंतविधी केला करण्यात आला.
सावखेडासिम ता. यावल येथील रहिवासी तथा तलाठी मोहंमद हनिफ तडवी यांचा लहान मुलगा आसिफ मो. हनीफ तडवी वय २७ हा अमेरीकेत एका जहाज कंम्पनीत अभियंता म्हणुन कार्यरत होता १४ जुलै रोजी समुद्रात जहाजामध्ये स्पोट होवुन त्यात आसिफ हा गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर अमेरीकेतील मियामी, फ्लोरिडा येथील जॅकसन हेल्थ सिस्टीम या हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते यात मागील आठवड्यात उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला तेव्हा गेल्या आठवड्या भरा पासुन त्याचा मृतदेह भारतात मुळ गांवी आणण्या करीता हालचाली सुरू होत्या व अखेर विशेष विमानाने त्याचा मृतदेह रविवारी मुंबइ येथे आणण्यात आला व रविवारी रात्री सावखेडासिम येथे त्यांच्यावर अंतविधी करण्यात आला.मयताच्या पश्चात पत्नी, आई, वडील, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here