सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल म्हस्के) । येथील ‘रुक्मिणी महोत्सव मिनी सरस’ प्रदर्शनामध्ये ‘उमेद’ – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल संपूर्ण टीमचा विशेष गौरव करण्यात आला. राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना. श्री. जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते गौरव पत्र देऊन या टीमला सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याला कुमार आशीर्वाद (जिल्हाधिकारी, सोलापूर), जंगम साहेब (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद), श्री. जगताप (प्रकल्प संचालक), सचिन चवरे (जिल्हा अभियान व्यवस्थापक) या प्रशासकीय स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ‘उमेद’ टीमने केलेल्या नियोजनाचे आणि महिला बचत गटांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल भरभरून कौतुक केले. ना. जयकुमार गोरे यांनी ग्रामीण विकासात ‘उमेद’ अभियानाचा कणा असल्याचे नमूद केले. कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळेच असे उपक्रम यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने महोत्सवासाठी अहोरात्र परिश्रम घेतले होते. या गौरवामुळे टीममध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी ‘उमेद’ अभियानातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला, यात तालुका अभियान व्यवस्थापक: उमेश डांगे, तालुका व्यवस्थापक: लिंगराज शरणार्थी, विलास दुपारगुडे, तायप्पा करे, प्रभाग समन्वयक: सविता खुळे, नम्रता काटकर, स्वप्नाली भगत, सुनील तोरणे यांचा समावेश होता. या सन्मानामुळे भविष्यात अधिक जोमाने आणि समर्पित वृत्तीने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे,” अशी भावना ‘उमेद’ टीमने यावेळी व्यक्त केली.







