रुग्णास दाखल करुन न घेतल्याने उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा राडा

दोंडाईचा (संतोष कोळी) – येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण सकाळी 10 वाजेच्या सुमारास दाखल करण्यावरून. वाद झाला या वादातून रुग्णाच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या दरवाजा व काच फोडला.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दोंडाईचा शहरातील राऊळ नगर या परिसरातील एका अपंग रुग्णाने कीटकनाशक चे औषध प्राशन केल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे नातेवाईकानी घेऊन आले होते यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रफुल दुगड उपस्थित होते त्यावेळेस उपजिल्हा रुग्णालयाचे मेन इन्चार्ज डॉक्टर नरोटे असल्या कारणाने यांच्याशी रुग्णाचे नातेवाईकांनी मोबाईलने संपर्क साधला असता त्यांचा फोन लागला नाही म्हणून उपस्थित डॉक्टर व नातेवाईक यांच्यात रुग्णाला दाखल करण्यावरून वाद झाला त्यानंतर या वादाचे रूपांतर एकमेकांशी डॉक्टरा सोबत शाब्दिक चकमक झाली त्याचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले .
याप्रसंगी रुग्णाच्या नातेवाईकांनी दवाखान्याच्या दरवाजा व खिडक्यांच्या काचा फोडली या घटनेच्या विषयी डॉक्टर प्रफुल दुगड यांनी विचारणा केली असता त्यांनी बोलण्याच्या मनस्थिती नाही असे सांगून बोलण्यास टाळले याप्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात सायंकाळपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नरोटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या फोन लागला नाही म्हणून पुढील कार्यवाही रुग्णांचे नातेवाईकांना व रुग्णावर कोणत्याही प्रकारच्या गुन्हा दाखल झाला नाही. ‌सदर रुग्ण दोंडाईच्या राऊळ नगर परिसरातील व तो शरीराने अपंग असल्याने उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर यांनी कुठलाही गुन्हा वा तक्रार सायंकाळी उशिरापर्यंत दाखल करण्यात आलेली नव्हती. डॉक्टरांची वाट न पाहता संबंधित रुग्ण घरीं निघून गेल्याने शहरात उपजिल्हा रुग्णालय संबंधित तर्कवितर्कांसह चर्चेला उधान आले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here