शहरातील बँकांसमोर तोबा गर्दी ……सोशल डिस्टंसिंगची ऐसीतैसी

शहादा (विजय पाटील) – शहरातील विविध बँकां समोर आर्थिक व्यवहार करण्यासाठी खेड्यापाड्यातून येणाऱ्या लोकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे यामुळे सोशल डिस्टंसिंगची ऐसी तैसी झाल्याचे चित्र दिसत आहे.
कोरोना महामारी पासून नागरिकांना वाचविण्यासाठी प्रशासन अतोनात प्रयत्न करीत असून त्यासाठी शासनाने काही नियम घालून दिलेले आहेत परंतु काही ठिकाणी या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. करोना संसर्गाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिक बँकांच्या समोर रांगा लावून आर्थिक व्यवहार करण्यासाठी उभी असतात परंतु बँकांकडून यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली दिसून येत नाही.बँकेसमोर उभे राहायला जागा कमी असल्याकारणाने नागरिक एकाच ठिकाणी गर्दी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक बळावत आहे. मात्र बँक प्रशासन सोशल डिस्टंसिंग चे योग्य पालन करत स्वतःचा बचाव करून ग्राहकाला बँकेमध्ये प्रवेश देत आहेत म्हणजे स्वतःचा जीव महत्त्वाचा असून नागरिकांच्या जिवाशी मात्र खेळ खेळला जात आहे.
दिवस दिवसभर बँकेसमोर उभे राहून देखील बऱ्याच वेळेस काही लोकांची कामे वेळेवर होत नाहीत त्यामुळे नागरिकांना पुन्हा पुन्हा याठिकाणी यावे लागत आहे आहे ज्यामुळे गर्दी अधिकच वाढत आहे. काही शेतकरी पीक कर्जासाठी बँकांच्या चकरा मारीत आहेत. बँकांमध्ये हे कृषी अधिकारी (बँक संलग्नित) उपलब्ध नसल्याने त्यांना वारंवार बँकेत यावे लागत आहे. बँकेकडून सुरक्षा अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरी प्रशासनाने बँकेचे या मनमानी कारभाराकडे लक्ष देण्याची गरज सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here