मी पॉझिटिव्ह…We Shall Win…!

  • शत्रुघ्न माळी (पोलीस निरीक्षक, पनवेल शहर नवी मुंबई)
    शब्दांकन – संपादक सुनिल पाटील
    कोरोनाच्या संक्रमण काळात सुरूवातीपासून परराज्यातील मजुर यांना पनवेल रेल्वे स्टेशन वरून दररोज 8000 लोकांना बसवत होतो , सामाजिक संस्थेमार्फत जेवण अन्नधान्य वाटप , विविध बंदोबस्त, पोलीस ठाणेत नियमित काम , नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात करोना बाधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर Covid 19 posetive करीता निवारा सेंटरवर सेंटर प्रमुख म्हणून दोन महिने काम करताना अनेकांच्या संपर्कात आलो. काळजी म्हणून काही वेळा कोरोना चाचणी केली. मात्र 7 दिवसापूर्वीच केलेल्या चाचणीत ‘पॉझिटिव्ह’ आलो. लक्षणे नसताना पॉझिटिव्ह आल्याने नियमानुसार ‘गृह विलगीकरणा’त (Home Isolation) आहे. माझे कुटुंबीय Negetive आलेत.
    मागील साडे पाच महिने कोरोना या विषाणूशी आपण सगळे लढा देत आहोत. लॉकडाऊन, मिशन बिगीन अगेन,कायदा व सुव्यस्था माध्यमातून कोरोनाचे संक्रमण थांबविण्याचा आपण सर्वांनीच प्रयत्न केला. या साडे पाच महिन्याच्या काळात प्रत्येक कोरोना वॉरियर्सने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी निकराचा लढा दिला. आजही देत आहेत. काळजी घेतली नाही तर हा विषाणू जीवघेणा ठरू शकतो. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायला हवी. कोरोनाच्या एन्ट्री नंतर अत्यावश्यक सेवा म्हणून कार्य करताना माझ्यासोबत माझ्या प्रत्येक सहकाऱ्याने आवश्यक ती सर्व काळजी घेतली. मात्र, सेवा देताना कुठे ना कुठे कोरोना रुग्णांशी संपर्क येत गेला. यातून आज मी स्वतः पॉझिटिव्ह निघालो. काळजी म्हणून मी गृह विलगीकरणात राहीन. परंतु, आपल्या सेवेचे कार्य थांबणार नाही. कारण मी जरी पॉझिटिव्ह आलो तरी आपण पॉझिटिव्ह येऊ नये, यासाठी माझी धडपड सुरूच राहील.
    We shall Win…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here