जळगाव (प्रतिनिधी शेख जावीद) | जिल्ह्यातील पाचोरा शहरातील साई मंदिरा जवळील सुशिल डेअरीसमोर हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या एका तरुणावर पोलिसांनी कारवाई करत त्यास ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३ हजार रुपये किमतीची तलवार जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण हातात तलवार घेऊन परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयित तरुणास ताब्यात घेतले त्याच्या कडून तलवार जप्त करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे
पाचोरा शहरात सार्वजनिक ठिकाणी शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत.







