पंढरपूर आरटीओ कॅम्पच्या लायसन्स बुकिंग मर्यादेत वाढ; नगराध्यक्षा डॉ. प्रणिताताई भालके यांच्या पाठपुराव्याला यश

लायसन्स

पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) | तालुक्यातील नागरिकांना वाहन चालविण्याचा परवाना; (लायसन्स) मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पंढरपूर आरटीओ कॅम्पमधील कच्चे व पक्के लायसन्ससाठी असलेली ऑनलाइन बुकिंगची मर्यादा पूर्वीप्रमाणे वाढविण्यात यावी, अशी मागणी पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रणिताताई भगीरथ भालके यांनी राज्याचे परिवहन मंत्री मा. ना. श्री. प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती.

पंढरपूरकर नागरिकांना लायसन्स काढण्यासाठी होणारी गैरसोय, ऑनलाइन स्लॉट मिळविताना येणाऱ्या अडचणी आणि वाढती मागणी लक्षात घेऊन नगराध्यक्षा डॉ. प्रणिताताई भालके यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला आता यश आले असून, पंढरपूर आरटीओ कॅम्पमधील ऑनलाइन बुकिंगची मर्यादा वाढवून १८० करण्यात आली आहे.
यामुळे पंढरपूर तालुक्यातील नागरिकांना लायसन्सच्या कच्च्या व पक्क्या चाचणीसाठी ऑनलाइन स्लॉट मिळविणे अधिक सुलभ होणार असून, लायसन्स प्रक्रियेसाठी नागरिकांची होणारी धावपळ व गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
“नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी केलेल्या मागणीची तातडीने दखल घेऊन बुकिंगची मर्यादा वाढविल्याबद्दल परिवहन मंत्री मा. ना. श्री. प्रताप सरनाईक यांचे मनःपूर्वक आभार,” असे नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रणिताताई भगीरथ भालके यांनी म्हटले.पंढरपूरकरांच्या प्रश्नांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि त्यातून मिळालेले हे यश नागरिकांसाठी दिलासादायक ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here