सेंट्रल आँक्सिजन सीस्टीमसाठी इनरव्हील क्लबकडुन २५००० रु ची भरीव मदत

दोंडाईचा (संतोष कोळी) – येथील कोरोना महामारी प्रसंगी सामाजिक सेवेतून जनसेवेसाठी रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स तर्फे दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात कोविड अत्यवस्थ १५ रुग्णांसाठी रोटरी सिनियर्सच्या सदस्यांच्या स्वखर्चातुन सेंट्रल आँक्सिजन सीस्टीम बसवीण्यात आली असुन अनेक रुग्णांना त्याचा फायदा होऊन रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नातुन जिवनदान मिळत आहे परंतु दिवसेंदिवस शहरातील कोविड रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने दोंडाईचा सोशल ग्रुप व रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्सच्या वतीने अजुन १५ रुग्णांसाठी शहरातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन करण्यात आले होते त्या आवाहनास प्रतिसाद देत दोंडाईचा शहरातील महिलांसाठी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या इनरव्हील क्लब दोंडाईचाकडुन २५००० रु ची भरीव मदत मिळाली , मदतीची रोख रक्कम इनरव्हीलच्या अध्यक्षा सौ मयुरा पारख यांनी रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया यांना सुपुर्द केली
याप्रसंगी प्रविण महाजन यांनी सांगितले की दोंडाईचा शहरातील दानशुर व्यक्तींनी असाच मदतीचा ओघ ठेवल्यास दोंडाईचा शहर व परिसरातील रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयातच आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील राहु उपचारासाठी धुळे किंवा इतरत्र हलविण्याची गरज पडु देणार नाहित . इरव्हीलच्या अध्यक्षा मयुरा पारख यांनी कोविडमुळे कोणताही रुग्ण दगावु नये व रुग्णांस आँक्सिजनची कमतरता भासुन त्याचा जिव धोक्यात येऊ नये म्हणुन रोटरी सिनियर्सने हाती घेतलेल्या सेंट्रल आँक्सिजन सीस्टीमसाठी इनरव्हीलतर्फे आम्ही हि मदत करत आहोत .
सदर प्रसंगी बांधकाम सभापती निखिल जाधव ,रोटरीचे अध्यक्ष चेतन सिसोदिया, राजेश भंडारी, राजेंद्र परदेसी,सौरव अग्रवाल ,प्रविण महाजन, इ उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here