पोलिसांच्या तत्परतेने आयएएस अधिकाऱ्याला मिळाली रिक्षात हरवलेली बॅग

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्री) – रिक्षात विसरलेली बॅग व त्या मधील मालमत्ता तक्रारदार यांना परत केल्याबाबत दिनांक २३/०८/२०२० रोजी फिर्यादी आयएएस अधिकारी श्रीमती नम्रता विनोद कांवळे (वय ४२ वर्षे) यांनी समक्ष पोलीस ठाणेस येवून कळविले की, त्या ऑटो रिक्षा मधून प्रवास करत असताना त्यांची रोख रक्कम रु. १५,५००/- व गणपतीच्या दोन चांदीच्या मुर्त्या , इतर मौल्यवान वस्तू असलेली निळ्या- हिरव्या रंगाची बॅग रिक्षा मध्ये विसरल्या बाबत तक्रार दिली.
त्यानंतर चेंबूर पोलिस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी भेट देवून सी.सी.टी.व्ही. फूटेज तपासून रिक्षाचा नंबर प्राप्त करून सदर रिक्षा चालकाला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे बॅगे बाबत चौकशी केली त्याने सदरची बॅग परत केली त्यानंतर सदर बॅग व त्यामधील वर नमूद रोख रक्कम व इतर वस्तु तक्रादार यांना परत त्यांच्या ताब्यात दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here