वाहन चोरी करणारा सराईत गुन्हेगार चेंबूर पोलिसांच्या ताब्यात

मुंबई (प्रतिनिधी अकबर मकरानी) – मोटार वाहन चोरी करण्याऱ्या सराईत गुन्हेगारास अटक केल्याबाबत दि 02/08/2020 रोजी फिर्यादी नामे श्री श्रीनिवास भी कुरबेन वय 40 वर्षे यांच्या रिक्षा चोरीच्या तक्रारी वरून चेंबूर पोलीस ठाणे गुरक्र 327/2020 कलम 379 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि ओलेकर,पो उप नि प्रदीप पाटील व पो ह जाधव, साळुंखे, पो शी पवार,पाटील, सुधीर माने ,प्रदीप माने यांनी पोलीस ठाणे हद्दीत वर नमूद गुह्यातील चोरीस गेलेली रिक्षा व एक संशयित इसम यास ताब्यात घेऊन पोलीस ठानेस आणून त्यांच्या कडे चौकशी केली असता त्यांने नमूद गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यास अटक करण्यात आली.
आरोपीचे नाव:- नरेंद्र रवींद्र कडू उर्फ नायडू वय 20 वर्षे राठी विष्णू नगर,एल यु गडकरी मार्ग,आर सी एफ,चेंबूर मुंबई असून, नमूद आरोपिकडे अधिक तपास केला असता त्याचा चेंबूर पोलीस ठाणे येथे खालील प्रमाणे इतर गुह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. चेंबूर पोलीस ठाणे गु.र.क्र 89/2020 कलम 379 भादवी, चेंबूर पोलीस ठाणे गु.र.क्र 299/2020 कलम 379 भादवी, चेंबूर पोलीस ठाणे गु र क्र 71/2020 कलम 392,34 भादवी, तसेच नमूद आरोपी हा खालील पोलीस ठाणे येथील मो/सायकल चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे
शिवाजी पार्क पोलीस ठाणे गु र क्र 45/2020 कलम 379 भादवी, पंतनगर पोलीस ठाणे गु र क्र 131/2020 कलम 379 भादवी, आर सी एफ पोलीस ठाणे गु र क्र 77/2020 कलम भादवी नमूद आरोपीचा साथीदार याच्याकडून दिनांक 05/03/2020 रोजी शिवाजी पार्क पोलीस ठाणे,पंतनगर पोलीस ठाणे, आर सी एफ पोलीस ठाणे च्या वर नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मो/सायकल चेंबूर पोलीस ठाणे यांनी हस्तगत केल्या आहेत.
नमूद आरोपीकडून खालील प्रमाणे मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे- रिक्षा क्रमांक MH 03 AB 9401 (चेंबूर पोलीस ठाणे गु र क्र 327/20 कलम 379 भादवी मधील चोरीस गेलेली रिक्षा), रेड मी कंपनीचा मोबाईल IMEI No-867381046318172/867381046318180, एम आय नोट 6 कंपनीचा मोबाईल IMEI No 861478047611914, विवो कंपनीचे 2 मोबाईल फोन आरोपीचा अभिलेख तपासला असता त्याचा वर खालील प्रमाणे गुन्हे नोंद आहेत आर सी एफ पोलिस ठाणे गु र क्र 21/2018 कलम 457,380 भादवी, आर सी एफ पोलिस ठाणे गु र क्र 35/2018 कलम 457,380 भादवी, आर सी एफ पोलिस ठाणे गु र क्र 254/2018 कलम 380 भादवी, आर सी एफ पोलीस ठाणे वि स्था गु र क्र 49/2018 कलम 122 मपोका, खार पोलीस ठाणे वि स्था गु र क्र 182/2019 कलम 122 मपोका, चेंबूर पोलीस ठाणे गु र क्र 57/2019 कलम 376 भादवी सह पोक्सो कलम 4,8,12, तसेच नमूद आरोपी कडे अधिक तपास करीत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here