कोळी समाजाच्या समाजहक्कांसाठी दोंडाईचा येथे पुकारला आवाज

दोंडाईचा (संतोष कोळी) – टोकरे कोळी, महादेव कोळी, कोळी ढोर, मल्हार कोळी सह 33 आदिवासी जमातींना विरोध करणाऱ्या आमदार खासदारांचे धाबे दणाणले आहे. कारण कोविड- 19 अनलॉक होताच, शासन विरुद्ध फक्त एकटा नंदूरबार जिल्ह्यात 50000 टोकरे कोळी व बाधित आदिवासी जमातीसोबत भव्य दिव्य मोर्च्याचे दिले आव्हान!
मा. छगन भुजबळ, साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने कोळी जमातीच्या सर्व पोट जमातीच्या अभ्यासासाठी जो अभ्यास गट निर्माण केला आहे, त्याचे स्वागत करण्यात आले आहे, कारण जात प्रमाणपत्र देण्याचे व पडताळणीची 23/2003 च्या सर्व नियमांचे पूर्णपणे प्रांताधिकारी व जात प्रमाणपत्र पडताळणी अधिकारी सरळ सरळ पायमल्ली करतात, असे कित्तेक प्रकरण आज सर्वच कार्यालयांमध्ये प्रलंबित आहेत.
मा. सर्वोच न्यायालयाच्या निर्णया आधारे महाराष्ट्र शासनाने अधिसंख्या बाबत जो, जीआर पारित केला आहे तो सर्वस्वी धोकेदायक आहे. ज्या कर्मचाऱ्यांना आजतगायत सेवेत संरक्षणाचे आश्वासन दिले होते, ते फक्त आश्वासन असून एक मोठा धोका ठरलंय, क्षेत्रीय बांधनाच्या व तत्सम सर्व शासन निर्णयांचे आधारे खान्देशातील कोळी नोंद असलेले सर्वच जसे टोकरे, ढोर या उपजमतीचे आहेत, हे निश्चित असतांना या जमातीच्या शासकीय सेवकांना सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे म्हणून यावर अनुभवाचा महामेरू, सर्वांना सोबत घेऊन चालणारे, संघटन बांधणीचा कौशल्यकार आणि तरुण तडपदारांचा गटा मार्फत सदैव कार्यरत असलेला असा तो सर्वदूर परिचित हेमंतदादा सूर्यवंशी यांनी या विषयावर प्रकाश टाकणारे वक्तव्य केले आहे, त्या समयी गणेश भाऊ कुवर (प्रसिद्धी प्रमुख, सामाजिक हक्क संरक्षण व प्रबोधन समिती, नांदुबर), कृष्णा कोळी(वाल्मीकलव्य सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष), गणेश सोळंकी ( सह सचिव, प्रबोधन समिती) बबन भाऊ कोळी (उपाध्यक्ष, प्रबोधन समिती), अमरजित कुवर (कोषाध्यक्ष), कांतीलाल सोनिस, इंदूताई सोनिस, रवींद्र शिरसाट, हिरालाल वाकडे, विनोद शिंदे, सुनील सुभाष कोळी, यासह कार्यकर्ते उपस्थित होते. जमातीच्या सर्व संघटना आपल्याच आहेत आणि म्हणून सर्व संघटनांसाठी आपण सदैव कार्यरत राहू हीच दीक्षा आणि कार्य सर्वांचे घडो असे मान्यवरांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्याचे आदिवासी कोळी महासंघ जिल्हा अध्यक्ष युवा नेतृत्व हेमंत सूर्यवंशी यांनी समाज हक्कासाठी आवाज पुकारला आहे

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here