शहादा तालुक्यातील चिखली खुर्द येथे कृषीदूतांकडून मार्गदर्शन

शहादा (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – शहादा तालुक्यातील चिखली खुर्द येथे शहादा येथील के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी करुणा पराग चव्हाण हिने तेथील शेतकरी बांधवांना शेती विषयक मार्गदर्शन केले.
के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालय शहादा येथील विद्यार्थिनी करुणा चव्हाण हिने रुरल एग्रीकल्चर वर्क एक्सपिरियन्स (रावे ) या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन निंबोळी अर्क संदर्भात माहिती दिली.तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिक म्हणून निंबोळी अर्क तयार करून दाखविला. व पिकांवर निंबोळी अर्क फवारणी केली. यावेळी शेतकरी उदेसिंग चव्हाण ,रतन चव्हाण , रणजीत चव्हाण ,पृथ्वीराज चव्हाण ,जयपाल चव्हाण रमेश चव्हाण आदी शेतकरी उपस्थित होते.यासाठी तिला शाळेचे प्राचार्य डॉक्टर प्रकाश पटेल , प्राध्यापक कुणाल पाटील ,प्राध्यापक संदीप पाटील व सर्व शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here