दोंडाईचा (संतोष कोळी) – धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता एक ही दिवस रजा/ सुटी न घेता अहोरात्र काम केले अशा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, (जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे) जितेन्द्र एस. सोनवणे यांना राज्यमंत्री तथा पालक मंञी धुळे जिल्हा अब्दुल सत्तार यांच्या हस्ते कोरोना योध्दा सन्मानपञ देऊन भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दिंनांक 15 ऑगस्ट, 2020 रोजी सन्मानित केले म्हणून उत्तर महाराष्ट्राचे मातंग समाजाचे विचारवंत, बुलंद तोफ जितेन्द्र सोनावणे यांना लहुजी शक्ति सेनाचे पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन अभिनंदन केले आहे.
यावेळी संतोषजी आहिरे, महाराष्ट्र संघटक ओंकार पगारे, धुळे जिल्हा अध्यक्ष बापू वाघ, जिल्हा सचिव व गोविंदा बेहडे, शहादा शहर अध्यक्ष तसेच विनोद खैलारे नाशिक यांनी शुभेच्छा दिल्या. याचप्रमाणे या कामगिरीबद्दल लहुजी शक्ती सेनचे राष्ट्रीय अध्यक्ष, मातंग हृदय सम्राट विष्णुभाऊ कसबे आणि प्रदेश अध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे तसेच प्रा. डॉ. दिनेश खरात, तळोदा व देवादादा कढरे, जिल्हा कार्याध्यक्ष, बहुजन रयत परिषद व सामाजिक कार्यकर्ते यांनी सामाजिक अंतराच्या मर्यादेमुळे (Social distancing) दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या





