मुंबई (उपसंपादक अनिल साळवी) – कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात आलेले हँडग्लोज (हातमोजे) पुन्हा धुऊन विक्रीसाठी तयार करणार्या टोळीला नवी मुंबई गुन्हे शाखने अटक केली. यात एकूण 50 लाख रुपयांहून अधिक रकमेचे हँडग्लोज पोलिसांनी हस्तगत केले.
अटक करण्यात आलेले आरोपी विविध जिल्ह्यांतील तसेच राज्यांचे रहिवासी आहेत. या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने हे हँडग्लोव्ह भिवंडी आणि वाळुंज एमआयडीसी औरंगाबाद येथून आणल्याचे सांगताच पोलिसांनी भिवंडीतील गोदामावर धाड टाकत असे 15 लाखांचे हॅन्डग्लोव्ह जप्त केले.







