रोटरी सिनियर्सच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी २० लोखंडी खाटा

दोंडाईचा (संतोष कोळी) – ‌दोंडाईचा शहर व परिसरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने उपजिल्हा रुग्णालयात खाटांची कमतरता जाणवत होती विशेषत विलिनीकरण कक्षात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने बरेचदा घरीच विलगीकरणात रहावे असे रुग्णालय प्रशासनातर्फे सांगितले जात असे परंतु बरेच रुग्णांना घरी स्वतंत्र रुम तसेच शौचालयाची व्यवस्था नसल्याने रिपोर्ट येईपर्यंत विलिगीकरण कक्षात ठेवण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात खाटांची कमतरता जाणवत होती म्हणुन रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्सच्या माध्यमातून २० लोखंडी खाटा उपलब्ध करून देण्यात आल्यात रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अर्जुन नरोटे , शिंदखेडा तालुका कोविड केंद्रांचे प्रभारी डॉ हितेंद्र देशमुख , दोंडाईचा नगरपलीकेचे आरोग्य सभापती जितेंद्र गिरासे यांना उपजिल्हा रुग्णालयात जाऊन खाटा सुपुर्द केल्या . याप्रसंगी उपस्थित डॉ दिपक सराफ, डॉ सचिन पारख, डॉ राजेंद्र पाटील, राजेंद्र परदेसी, महेंद्र चोपडा ,सौरव अग्रवाल,इ सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here