ग्रामपंचायत सोनवद खुर्दतर्फे कोरोना योध्यांचा सत्कार

धरणगांव (प्रतिनिधी विजय पाटील) – सोनवद खुर्द ग्रामपंचायततर्फे दि 6 सप्टेंबर 2020 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सर्व कोरोना योध्यांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये गावातील व परिसरातील सर्व डॉक्टर्स, पत्रकार, आशा स्वयंसेविका, सेविका, स्वच्छताग्रही यांचा सन्मान करण्यात आला . सर्व सत्कारार्थीना विशेष सन्मानपत्र,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यामध्ये ज्येष्ठ डॉक्टर सी पी पाटील(सोनवद), ऋषिकेश झंवर( डॉक्टर,प्राथमिक आरोग्य केंद्र सोनवद), डॉ.सुभाष पाटील(सोनवद), डॉ.गिरीश चव्हाण(प्राथमिक आरोग्य केंद्र सोनवद), डॉ.संदीप पाटील(सोनवद), डॉ.अभय पाटील(सोनवद), पत्रकार विजय पाटील(महाराष्ट्र लाईव्ह न्युज), आत्माराम भोई(लोकमत), अशोक पाटील(स्वछताग्रही)आशा स्वयंसेविका श्रीमती शांताबाई लाखे, सूर्यकांत भाटिया, श्रीमती शोभाबाई खैरनार( स्वयंसेविका), श्रीमती सुनंदाबाई पाटील(स्वयंसेविका), संतोष शिरसाठ(ग्रा पं सफाई कर्मचारी)यांचा समावेश होता.
या समारंभासाठी मार्गदर्शन रमेश भगीरथ पाटील(सरपंच सोनवद खु. ) यांचे होते . यावेळी उपसरपंच विजय लाखे, ग्राम पं सदस्य कोकिलाबाई पाटील, नवल कोळी, लक्ष्मीबाई भाटिया, श्याम सोनवणे, ग्राम पंचायत कर्मचारी राजेंद्र ठाकूर व ग्रामस्थ यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पद्माकर पाटील यांनी केले. सर्व कोरोना योध्यांना पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here