जळगावात कोरोना बळींची संख्या ८७७ झाली

आज आढळले ११८५ कोरोनाबाधित; जिल्ह्यात कोरोनाबाधितांची लक्षणीय वाढ

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कोरोनासंशयित रुग्णांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आज (दि.७) तब्बल ११८५ कोरोनाबाधित आढळून आले. त्यातील जळगाव शहरात सर्वाधिक ३२८ कोरोनाबाधित आढळले असून, यावल, चाळीसगाव, पारोळा तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान आज ५१७ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या ११८५ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर-३२८, जळगाव ग्रामीण-८२, भुसावळ-५५, अमळनेर-८२, चोपडा-६२, पाचोरा-६५, भडगाव-३८, धरणगाव-२८, यावल-१०६, एरंडोल-२९, जामनेर-२६, रावेर-१७, पारोळा-७१, चाळीसगाव-९५, मुक्ताईनगर-७१, बोदवड-१३ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १७ असा समावेश आहे.
यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३३ हजार ६१८ इतकी झालेली आहे. यातील २३ हजार ३४३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा ८७७ इतका झाला आहे. सद्यस्थितीत ९ हजार ३९८ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here