पिंप्री परिसरात जागतिक छायाचित्रण दिन उत्साहात साजरा

प्रेस फोटोग्राफर

धरणगाव (प्रतिनिधी विनोद पाटील) | पिंप्री परिसरात 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिन मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला. यानिमित्त पिंप्री तसेच परिसरातील फोटोग्राफर बंधू एकत्रित येत कॅमेऱ्यांचे विधिवत पूजन करून नारळ फोडला.

कार्यक्रमानंतर उपस्थित फोटोग्राफर बंधूंनी चहा-पाण्याचा आस्वाद घेतला. यावेळी फोटोग्राफी क्षेत्रातील सध्याच्या घडामोडी, बदलते तंत्रज्ञान, व्यवसायातील अडचणी तसेच भविष्यातील वाटचाल यावर चर्चा करण्यात आली. फोटोग्राफर बंधूंमध्ये एकोपा व सहकार्य वाढावे, तसेच फोटोग्राफी क्षेत्राच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
या कार्यक्रमास पिंपरी परिसर गटाचे अध्यक्ष सुभाष पाटील, उपाध्यक्ष जे. डी. पाटील,प्रकाश लोखंडे श्याम पाटील, विजय पाटील, विक्की पाटील अमोल पाटील, गोपाल पाटील, सिधु लोखंडे रवी मनोरे, पवन पाटील, पवन पाटील सुनील बारेला मिलींद पाटील तसेच परिसरातील इतर स्थानिक ग्रामीण फोटोग्राफर बंधूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.फोटोग्राफर बंधूंच्या एकजुटीचे दर्शन घडवत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
छायाचित्र : जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त कॅमेऱ्यांचे पूजन करताना पिंप्री परिसरातील फोटोग्राफर बंधू. फोटो सहित बातमी घेणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here