दोंडाईचा (संतोष कोळी) – दोंडाईचा शिंदखेडा मतदारसंघातील अगदी अल्प दरात वैद्यकीय सेवा देणारे, पाचशे ते सातशे
कुटुंबांचे चूल पेटवणारे अनेकांना रोजगार देणारे ,डॉक्टर कै रवींद्रनाथ टोणगावकर हे विशेष करून हर्निया मुतखडा तज्ञ डॉक्टर होते.
खानदेशातील भूमिपुत्र आणि वैद्यकीय क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव पटकावणारे शहरातील अंधश्रद्धा चे मुख्य प्रमुख माननीय कैलास वासी डॉक्टर रवींद्र गावकर हे अमेरिका स्विझर्लांड, थायलँड, रशिया, ऑस्ट्रेलिया ,वाशिंग्टन, नेपाल तसेच गुजरात ,उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश ,महाराष्ट्र राज्यातील अशा कितीतरी देशात व राज्यात वैद्यकीय सेवा दिली.त्यांनी गोरगरीब जनतेसाठी सेवा दिली होती असे खानदेशातील सुप्रसिद्ध डॉक्टर कै नानासाहेब रवींद्रनाथ टोणगावकर यांचे आज कोरोणामुळे निधन झाले.
दोंडाईचा शहरातील अनेक वर्षापासून डॉक्टरी व्यवसायात आपले दवाखान्यात जनसेवा करित असताना संपूर्ण देशभरात प्रसिद्ध झालेले डॉक्टर रवींद्र टोणगावकर यांचे कार्य कितीही शब्दात उल्लेखनीय केले तरी पूर्ण होणार नाही अशा पितामहा व्यक्ती ,रोटरी क्लब झुंजार नेतृत्व आपल्या संपूर्ण धुळे जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्थळावर नेणारे, विविध क्षेत्रांत पुरस्कार गौरव होऊन जिल्ह्यापासून तर दिल्लीपर्यंत आणि अनेक आंतरराष्ट्रीय देशातील सन्मानपूर्वक विविध प्रकारच्या पुरस्कार त्यांनी पटकावले.
राष्ट्रपती पासून तर मुख्यमंत्री राज्यमंत्री असो किंवा कलावंत सिनेकलावंत अभिनेता आंतरराष्ट्रीय पत्रकार साहित्यिक अशा कितीतरी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना देशातील नामवंत लोकांनी गौरव करून आपल्या राज्यात वैद्यकीय सेवा करावी म्हणून अनेक वेळा नावांची मागणी होत होती परंतु डॉक्टर नानासाहेब यांनी रोखठोक उत्तर दिले की मी फक्त माझ्या खानदेशात वैद्यकीय सेवा करणार मला पैसा नको मला रुग्ण सेवा हवी ,ती फक्त खानदेशात माझ्या पद्धतीने करेन, अशी आणि आज दोंडाईचा शहरातील व्यक्तिमत्व भूषविणारे डॉक्टर रवींद्रनाथ टोणगावकर हे आपल्यापासून निघून गेले आहेत शहरापासून तर संपूर्ण राज्यात आणि इतर देशातील देखील शोक संदेश त्यांच्या निधनाबद्दल येत आहे
वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि पत्रकार साहित्यिक राजकीय सेवाभावी संस्था ट्रस्ट, कलावंत अशा कितीतरी क्षेत्रातील लोकांमधील डॉक्टर कै नानासाहेब टोणणगावकर हे त्यांच्या हृदयात घर करून बसलेले होते आणि ते आज आपल्यापासून विलीन झाले अशा देवदुत व्यक्तिमत्त्वाला ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे चेअरमन डॉक्टर हेमंत राव देशमुख माजी कामगार राज्यमंत्री माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख बँकेचे चेअरमन कैलास जैन रोटरी स्कूल चे चेअरमन हिमांशू शहा वक्री पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पवार जैन दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार मनोहर देवरे अखिल भारतीय युवा कोळी समाज धुळे जिल्हाध्यक्ष संतोष कोणी पत्रकार जिल्ह्यातील व, दोंडाईचा मराठी पत्रकार असोशिएन ,महात्मा ज्योतिबा फुले ग्रंथालय पत्रकार जिल्हा अध्यक्ष संतोष कोळी यांच्यासह जिल्हा निरीक्षक रवींद्र देवरे कायदेशीर सल्लागार संतोष भोई जिल्हा कार्याध्यक्ष विनोद कोळी जिल्हा संपर्कप्रमुख छोटू सैंदाणे उपनिरीक्षक बापू बोरसे शहर अध्यक्ष मयूर भटू कोळी उपाध्यक्ष आप्पा कोळी
सर विशाल कोळी राहुल कोळी हिरालाल सावळे अविनाश महाले इत्यादींच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.डॉक्टर कै रवींद्रनाथ टोणगांवकर यांच्या परिवाराला परमेश्वर दुःख सहन करण्याची सहनशीलता लाभो असे यावेळी श्रद्धांजली जिल्हाध्यक्ष पत्रकार संतोष कोळी रवींद्र देवरे नवनीत वागले ओमकार पगारे ऋषिकेश पाटील इत्यादींनी श्रद्धांजली वाहण्यात आली




