पोलीस स्मृतिदिनानिमित्त राहाता तालुका मुस्लीम सेवा संघाकडून शहिद पोलीसांना श्रद्धांजली

राहाता (प्रतिनिधी) : गुरुवार (दि.२१) लदाख मध्ये हॉटस्प्रिंग नावाचे १०ते १५ हजार कि.मी.उंचीच्या शिखरावर भारतीय पोलिस गस्त घालत असतांना चीनच्या भ्याड सैनिकांनी हल्ला केला. त्यावेळी आपल्या भारतीय पोलिस जवांनाना विर मरण आले. त्या दिवसा पासून पोलिस हुतात्मा म्हणजे स्मृती दिवस म्हणून शहिद पोलिसांना आदंरजली वाहिली जाते.

पोलीस स्मृतिदिनानिमित्त राहाता तालुका मुस्लीम सेवा संघाकडून शहिद पोलीसांना श्रद्धांजली वाहून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलिसांना श्रध्दांजली वाहण्यासोबत उत्कृष्ट कार्याबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

यावेळी शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील, उप पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचारी यांचा सत्कार राहाता तालुका अध्यक्ष मुस्लिम सेवा संघ.मा.रोटरी क्लब अध्यक्ष गफ्फारखान पठाण , हजरतअली सय्यद , इम्रान शेख नदीम पठाण यांच्या वतीने करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here