विद्यापीठाने अंतिम सत्राची परीक्षा ‘वस्तुनिष्ठ न’ घेता ‘गृहपाठ’ आधारित घ्यावी – प्रदेशाध्यक्ष राहूल वाकलकर

जळगांव (प्रतिनिधी विजय पाटील) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा गृहपाठ पद्धतीने घ्याव्यात यासाठी भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहूल वाकलकर यांनी कुलगुरूंना ऑनलाईन निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रमध्ये कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता राज्य शासनाने अंतिम सत्रातील विध्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला होता, परंतु न्यायालयाच्या निर्णयानुसार व U.G.C च्या नियमानुसार अंतिम सत्रातील परीक्षा घेण्यात येणारं आहेत,परंतु अव्यावसायिक-व्यावसायिक अभ्यासक्रम लक्षात घेता वस्तुनिष्ठ पद्धतीने विद्यार्थ्यांचे गुणांकन मूल्यमापन करणे योग्यचं नाही, तसेच विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ पद्धतीने सामोरे जाण्याचा अनुभव नाही. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करता यां परीक्षा मध्यप्रदेश, झारखंड, बनारस विद्यापीठ प्रमाणे “Home Assignment Based Examination” पद्धतीने घेण्यात यावी.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अंतिम सत्रातील विध्यार्थ्यांच्या परीक्षा यां वस्तुनिष्ठ ( Multiple Choice Question – M.C.Q )पद्धतीने होणार असल्याचा संभ्रमातक परिस्थिती विध्यार्थ्यांमध्ये असल्याने कमालीची अस्वस्थता व नाराजी पसरल्याचे दिसते.
नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे तसेच जळगांव, धुळे यां जिल्ह्यातून बरीच ग्रामीण भागातील विध्यार्थी शिक्षण घेतात. गृहपाठ पद्धतीने परीक्षेचा विध्यार्थी हिताचा निर्णय विद्यापीठाने घ्यावा अशी भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहूल वाकलकर यांनी कुलगुरू पी.पी.पाटील यांच्याकडे ऑनलाईन निवेदनात्मक मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here