जळगाव (संपादक सुनिल पाटील) । दिनांक २ ऑक्टोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या फोटोला महानगर जिल्हाअध्यक्ष अशोक लाडवंजारी व जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय एस महाजन सर यांच्या हस्ते पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले
यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी वाय एस महाजन सर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस एजाजभाई मलिक , प्रदेश सरचिटणीस जयप्रकाश चांगरे , जिल्हा कार्यालय सरचिटणीस सुनील माळी , समन्वयक विकासदादा पवार , जळगाव शहर विधानसभा प्रमुख जयप्रकाश महाडिक सर , ओबीसी सेलचे जिल्हाअध्यक्ष गिरीश सांगळे , अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मजहरभाई पठाण , जिल्हा उपंअघ्यक्ष किरणभाऊ राजपूत , माजी ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष नामदेववाऊ वाघ , सरचिटणीस सुहासभाऊ चौधरी , फहरान शेख , सतिश चौव्हाण पदाधिकारी उपस्थित होते.







