दोंडाईचा (संतोष कोळी) – बोरिस ता.जिल्हा धुळे युवा अंतर्गत अनुभव शिक्षा केंद्र तर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या
विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळा वार-रविवार दि.१३ सप्टेंबर २०२० रोजी,सायंकाळी ठीक 05:00 वाजता ,ASK Khandesh. या फेसबुक पेजवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते प्रा. निलेश माळी राहणार बोरिस ह. मु. नाशिक. हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन युवा अनुभव चे प्रकल्प समन्वयक श्री.नितीन मते,विभागीय समन्वयक प्रिया ठाकूर करीत आहे.
सध्या कोरोना च्या महामारी संकट मुळे युवा-युवती संभ्रम अवस्थेत आहेत.महाविदयालय ,वाचनालये व स्टडी सेंटर बंद आहेत.यामुळे विदयार्थी ना योग्य मार्गदर्शन सध्या मिळत नाही,यासाठी कार्यशाळे चे आयोजन केले आहे.तरी ऑनलाईन पाहण्याचे अवाहन अनुभव शिक्षा केंद्र चे जिल्हा समन्वयक श्रीमती अश्विनी जाधव,अनिता शिरसाठ,अनिकेत घुले,सत्यम मते,शुभम पाटील,मयुरी माळी, शुभम शिंपी,अमळनेर,साथी झेंडू ठाकरे,प्रतिभा पाटील,मनीषा हिरे,ममता मिस्तरी,महेश नगराळे,गौतम वाघ,सुनील पवार,जयश्री पाटील, दिनेश बारेला,राहुल माळी,अमोल माळी, सुशील माळी, आदींनी केले आहे.





