धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – शुक्रवार दि ११ रोजी मराठा आरक्षणाला कोर्टाने स्थगिती दिल्याने धरणगाव तालुका सकल मराठा समाजाकडून तहसीलदार श्री.देवरे यांना निवेदन देऊन आरक्षणासंदर्भात मागण्या करण्यात आल्या.
निवेदनात प्रामुख्याने (१) मराठा आरक्षणा संदर्भात महाराष्ट्र सरकारने भक्कम बाजु माडुन तद्म वकिली समिती नेमावी, (२) सन २०२० या वर्षी विध्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश मराठा आरक्षणा नुसार मिळावा, (३) शासकीय जागा भरती करताना कोर्टाच्या आदेश येई पर्यंत आरक्षणा नुसार जागा रिक्त ठेवण्यात यावे या मागण्या मागण्यात आल्या आहेत.
मराठा आरक्षणा संबधी महाराष्ट्र सरकाराने योग्य निर्णय घ्यावा अन्यथा सकल मराठा समाज रस्त्यावर येईल व होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार राहिल, असा इशारा यावेळी सकल मराठा समाजाकडून देण्यात आला.
तहसीलदारांना निवेदन देतेवेळी गोपाल पटील, चंदन पाटील, गुलाब मराठे, भिमराज पाटील, लक्ष्मण पाटील, वाल्मिक पाटील, वैभव पाटील, राहुल मराठे, दिनेश भदाणे, कैलास मराठे, चिचपुरा, ललित मराठे, चेतन जाधव, अमोल पाटील, भोणे, आनंद पाटील, राहूल पाटील, हरीष पाटील आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.







