मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – उल्हासनगर कॅम्प नंबर ४, लालचक्की येथील अन्याय संघर्ष समिती आणि सार्वजनिक मित्र मंडळ, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांद्वारे सचिन पगारे आणि सुशील पगारे या बाप लेक यांचा भव्य सत्कार सन्मान समारोह जेष्ठ पत्रकार, नगरसेवक दिलीप मालवणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या समारोहात प्रमुख अतिथी प्रमोद टाले, नगरसेवक शांताराम निकम तसेच समाजसेवक सुधीर परांजपे, शरदभाऊ माने उपस्थित होते.
सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमधे सचिन पगारे लिखित ‘सूर्य चोरलेला माणूस” (A Man Who Stolen Sun) १३ मिनिटांचा मराठी लघुपट जगाच्या विविध शहरातून आलेल्या ४ हजार ५९९ चित्रपटांतुन हा लघुपट निवडला गेला आहे. या लघुपटाची निर्मिती, दिग्दर्शन, आंतराष्ट्रीय स्तरावर निवड इथपर्यंतच सर्व प्रवास यावर सचिन – सुशिल यांनी या समारोहात आपले मनोगत व्यक्त केले. सचिन – सुशील हे लॉर्ड बुद्धा चॅनलचे प्रतिनिधी आहेत. सचिन पगारे हे पूर्वी आय. आय. टी. मध्ये नोकरी करत होते. पण लिखणाची आवड असल्याने त्यांनी नोकरी सोडून लिखाण क्षेत्रात पाऊल टाकले. अवघ्या १३ मिनिटात नाट्य कलाकाराच्या व्यथा मांडताना त्याचा होणार दुर्दैवी अंत अशी ही ह्रदयस्पर्शी गोष्ट आहे. व्यावसायिक अभिनेते हरिभाऊ भंडारे यांनी हृदयाला पाझर फोडणारी भुमिका साकारली आहे. पुढील महिन्यात गुजरातमधे महोत्सव होणार आहे. साहित्य – कला कवितेची जाण असणारे दिलीप मालवणकर यानी सचिन सुशील यांनी उल्हासनगरचे नाव आंतराष्ट्रीय स्तरावर नेले आहे असे बोल विचार स्पष्ट केले आहे.
या सत्कार समारोहात प्रदिप कपूर, राजू पंजवणी, हरी चावला, कुमार रेड्डीयार, समीर मंसूरी, सुखनंदन गवई, जॉनी डेव्हिड, किरण टेलगोटे, सुशील पगारे, दिपक मोरे, पंकज गुरव आणि अन्य पत्रकार यांची हजेरी लागली. कोरोना कोविड – १९ च्या परिस्थितीत नियमांचे पालन करूनच हा कार्यक्रम संपन्न झाला.







