अपहरण करुन नातेवाईक तरुणाकडून तरुणीवर गाडीत बलात्कार

पुणे (उपसंपादक प्रभाकर निकम) – तरुणीचे अपहरण करुन गाडीतच तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी दुपारी बावधन परिसरात घडली. याप्रकरणी बालेवाडी येथील एका 30 वर्षीय तरुणीने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून तरुणीच्या 35 वर्षीय नातेवाईकाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 30 वर्षीय तरुणीचा आरोपी हा नातेवाईक लागतो. त्याने फिर्यादीला जबरदस्तीने ब्रीझा कारमध्ये बालेवाडी येथे बसवले. दरम्यान, जबरदस्तीने घेऊन जात असताना फिर्यादीने आईला फोन करुन याबाबत माहिती दिली. त्यावेळी राग आल्याने आरोपीने तिचा मोबाईल घेऊन फोडून टाकला. यानंतर हाताने मारहाण करत गप्प गाडीत बस नाहीतर मारुन टाकीन अशी धमकी दिली. त्यानंतर बावधान येथे गाडी बाजूला घेऊन माझ्या शिवाय दुसऱ्या कोणाबरोबर लग्न करायचे नाही असे म्हणत पाठीमागील सीटवर तिच्यावर बलात्कार केला. झालेल्या प्रकारानंतर तरुणीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी नातेवाईकाला अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here