रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – तालुक्यातील सुलवाडे येथील शेतात वीज पडुन महिला जागीच ठार झाल्याची घटना दिनांक १० सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता घडली.
आशाबाई राजेंद्र महानुभाव वय (३५) असे मयत महिलेचे नाव आहे,सुञांनुसार राजेंद्र केशव महानुभाव त्यांची पत्नी आशाबाई,व मुलगी असे तीन जण गुरुवारी सकाळी गावालगतच्या शेतात शेतीच्या कामानिमित्त गेले होते,या दरम्यान साडे अकरा वाजेला पाऊस सुरु झाला,विजेचा कडकडाट सुरु झाला.यामुळे आशाबाई ह्या शेतातच असलेल्या निंबाच्या झाडाखाली थांबल्या. आणि राजेंद्र व त्यांची मुलगी हे शेतातच थांबले,नेमकी याचवेळी वीज या झाडावर कोसळली.त्या झाडाखाली थांबलेल्या आशाबाईंचा जागीच मृत्यु झाला.
घटना घडली तेव्हा आशाबाईंच्या कानातील सोन्याचे डुल,तसेच पायातील चांदीच्या तोरड्या आपोआप जमिनीवर गळुन पडल्याचे दिसले.त्यांचे रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.त्यानंतर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.आशाबाईंच्या पश्चात पती,दोन मुले,सासु-सासरे व दीर असा त्यांचा परिवार आहे. घटनास्थळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, निंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश जानकर, तलाठी विजय शिरसाठ यांनी भेट देऊन पाहणी केली.







