सॅनिटायजर लावून लूटले 40 लाख

अलीगढ- उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये बाईकवरून आलेल्या सशस्त्र लुटारूंनी भर दिवसा सराफाचे दुकान लूटले आणि 40 ते 50 लाखांचा माल घेउन पोबारा केला. भरदिवसा घडलेल्या या घटनेची चर्चा होत आहेच. मात्र त्याहीपेक्षा जास्त चर्चा चोरांनी पाळलेल्या करोनाच्या आचारसंहितेची होत आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असल्यामुळे उघड झाला आहे.
लूटमार करण्याच्या उद्देशानेच सराफाच्या दुकानात दाखल झालेल्या चोरट्यांनी करोनाच्या सुरक्षेच्या संदर्भातील सगळ्याच नियमांचे पालन केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या चोरांनी चेहऱ्यावर मास्क लावला होता. त्यानंतर दुकानात प्रवेश केल्यावर त्यांनी अगदी आरामात हात सॅनिटाइज केले. त्यानंतर त्या तिघांनी रिव्हॉल्वर बाहेर काढत आपला कार्यभाग साधला.
दुकानातल्या एका लहान मुलाच्या डोक्‍याला बंदुक लावून त्यांनी धमकावले व चोरीचा माल घेत पोबारा केला. दुपारी सव्वा एकच्या सुमारास ही घटना घडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here