पंजाबमध्ये सीमेजवळ शस्त्रसाठा सापडला

चंदिगड – सीमा सुरक्षा दलाने शनिवारी पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेजवळच्या एका शेतातून शस्त्रसाठा जप्त केला. यामध्ये तीन एके-47 रायफली आणि दोन एम-16 रायफलींचा समावेश आहे.
याशिवाय एके-47 रायफलींची 6 मॅगझीन आणि 91 काडतुसे, एम-16 रायफलींची 4 मॅगझीन आणि 57 काडतुसे, दोन पिस्तूल, चार मॅगझीन आणि 20 काडतुसे असा दारुगोळाही बरोबर आडळून आला आहे, असे बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळी 7 च्या सुमारास शोधमोहिमेदरम्यान बीएसएफच्या जवानांना ही शस्त्रे आणि दारूगोळा सीमेजवळच्या एका शेतामध्ये पडलेली आढळून आली. या भागात अधिक शोधमोहीम केली जात आहे. या संदर्भात अद्याप कोणावर कारवाई केल्याचे वृत्त नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here