उत्तराखंडच्या डोंगराळ रस्त्यावर मृत्यूचे थैमान; प्रवाशांनी भरलेली बस पाण्यात कोसळली

उत्तराखंड

रुद्रप्रयाग (वृत्तसंस्था) | मंगळवारी ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावरील गुलार बाजारजवळ पुलाखाली सुमारे १०० मीटर खोल पाण्यात प्रवाशांना घेऊन जाणारी एक बस अनियंत्रित होऊन कोसळली. अपघात झाला त्यावेळी या बसमध्ये तब्बल ३० ते ३५ प्रवासी प्रवास करत होते. रात्रीच्या अंधारात घडलेल्या या दुर्घटनेत ८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, इतर बरेच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

 

या भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच, मदत आणि बचाव कार्यासाठी एसडीआरएफच्या ब्यासी आणि धलवाला चौक्यांमधील पथके घटनास्थळी दाखल झाली. एसडीआरएफ कमांडर अर्पण यदुवंशी यांच्या निर्देशानुसार सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, या दोन्ही अपघातांच्या नेमक्या कारणांचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here