दोंडाईचा (संतोष कोळी) – हे राष्ट्रीय स्मारक म्हणून लवकरात लवकर घोषित करावे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व आई सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेली देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा पुणे ,हे ठिकाण शासनाने तात्काळ संपादित करून राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करून विकसित करणे बाबत दोंडाईचा येथे नायब तहसीलदार श्री. मोरे यांच्याद्वारे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा.अनिल महाजन, प्रदेश संघटक प्रविण भाऊ महाजन, धुळे जिल्ह्या अध्यक्ष राजेंद्र भाऊ तावडे, यांच्या मार्गदर्शनाने धुळे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज महाजन सर, दोंडाईचा शहराध्यक्ष रवींद्र महाजन, शिंदखेडा तालुका कर्मचारी आघाडी अध्यक्ष राजेश महाजन, दोंडाईचा कर्मचारी आघाडी अध्यक्ष अनिल जाधव सर, युवा अध्यक्ष महेंद्र महाजन, सचिव अनिल माळी सर, निर्मल महाजन, निखिल जाधव यांनी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, देशातील नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा पुणे ही प्रसिद्ध आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1848 साली मुलींची पहिली शाळा काढली व ज्ञानाची गंगा दारोदारी पोहोचवली ज्या फुले दाम्पत्यांनी अनेक अडचणींचा सामना करून विरोध पुकारुन देशात मुलीसाठी भिडेवाडा मधून शिक्षणाचे दारे खुले करून दिले त्या भिडेवाड्याची आज अवस्था खूपच दयनीय झालेली आहे. या ठिकाणाची अवस्था पाहुन तमाम फुले प्रेमी अनुयायांसाठी वेदनादायक आहे. तरी लवकरात लवकर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व आई सावित्रीबाई फुले भिडेवाडा पुणे हे राष्ट्रीय स्मारक घोषित करावे असे निवेदन देण्यात आले आहे.
Home उत्तर महाराष्ट्र दोंडाईचा मुलींची पहिली शाळा भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची माळी समाज महासंघाची मागणी




