जळगाव (प्रतिनिधी मिलिंद वाणी) – महाराष्ट्र सुरक्षारक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ यांची कामगिरी आले यश महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ गेल्या या दोन ते तीन महिन्यापासून शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर या ठिकाणच्या तेरा सुरक्षा रक्षकांच्या पगार संदर्भात कोल्हापूर ते मंत्रालय असा प्रवास करत होते पत्रव्यवहार करत होते तसेच मंत्रीमहोदय शिक्षण मंञी उदय सामंत साहेब यांना भेटून तसेच वारंवार पाठपुरावा करून माननीय राज्य कामगार मंञी बच्चू कडू साहेब यांना वारंवार निवेदन देऊन पाठपुरावा करून महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ सलग्न भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी अहोरात्र झटत होते तसेच माननीय सुरक्षा रक्षक सल्लागार समिती सदस्य श्री विशाल मोहिते साहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार भेटून पत्रव्यवहार करून मंत्रालयातून शासकीय तंत्रनिकेतन च्या सुरक्षा रक्षकांच्या साठी सहा ते सात महिन्याचा निधी(PLA) मंजूर करून आणला आहे
महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ सलग्न भारतीय मजदूर संघाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील स्वतः या गोष्टीमध्ये गेले दोन ते तीन महिन्यापासून लक्ष घालून हा निधी मंजूर करून आणला आहे तरी हा प्रश्न शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर येथील सुरक्षारक्षकांच्या जिव्हाळ्याचा होता की या कामाचे भागीदार महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ सलग्न भारतीय मजदूर संघ व सर्व पदाधिकारी यांनी आपण न होणारी गोष्ट करून दाखवली आहे
भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून तरी भारतीय मजदूर संघाचे कोल्हापूर सचिव अभिजीत केकरे यांचे सुद्धा मनापासून आभार त्यांनीसुद्धा सुरक्षा रक्षकांना मोलाची साथ दिली आहे तसेच महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बागडी शिवाजी चौगुले ज्ञानदेव मानकर दादा पाटील जयदीप पाटील कृष्णात मिरजे अतुल पाटील आणि महासंघाचे बाकीचे सर्व सहकारी यांनीसुद्धा मोलाची साथ दिली आहे त्यांचे भारतीय मजदूर संघा कडून मनापासून आभार तसेच परत एकदा विशाल जींचे सुद्धा संघाकडून मनापासून आभार भारतीय मजदूर संघाचा विजय असो देश के हीत मे करगे काम काम का लेंगे पुरा दाम आसा नारा महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ चे प्रदेश उपाध्यक्ष श्री संदीप पाटील साहेब यांनी नारा दिला.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ पाठपुराव्याला यश







