प्रांताधिकार्‍यांच्या पुढाकाराने पेण मधील पत्रकारांची कोरोना चाचणी शिबिर संपन्न

जेष्ठ पत्रकार स्वर्गीय संतोष पवार यांना श्रद्धांजली

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – रायगड प्रेस क्लबचे नेते आणि माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाल्याची घटना घडल्याने या घटनेची गंभीर दखल घेऊन पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी यांच्या नेतृत्वाखाली येथील पत्रकारांंनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांची भेट घेऊन तालुक्यातील पत्रकारांकरिता कोरोना चाचणी शिबिर घेण्याची मागणी केली. अँटीजन टेस्ट आज पेण येथे घेण्यात आली.
सदर मागणीची तातडीने दखल प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी घेतली व पेण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना पत्रकारांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले. तसेच जे पत्रकार पॉझिटिव्ह येतील यांच्या कुटुंबीयांची अँटीजन टेस्ट करण्याचे व पुढील उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, पत्रकार राजेश प्रधान, संतोष पाटील, कमलेश ठाकूर, राजेश कांबळे, सुनिल पाटील, स्वप्नील पाटील, विजय मोकल, नरेश पवार, संतोष पाटील, प्रशांत पोतदार, अनिस मणियार, दीपक लोके, प्रकाश माळी, धनाजी घरत, प्रदीप मोकल, एजाज मणियार, गणेश पाटील, विनायक पाटील, सुभाष टेम्बे, किरण बांधनकर आदी पत्रकारांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी ३० पत्रकारांची करोना चाचणी करण्यात आली.
सदर शिबिराकरिता डॉ.अभिजित पाटील, डॉ.प्रभाकर सोनावणे, डॉ.विशाल महाजन, डॉ.तेजस्विनी म्हात्रे व दिशा लॅबचे डॉ.गोसावी यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी जिल्ह्यातील पत्रकारांचे नेते स्वर्गीय संतोष पवार यांना पेण प्रेस क्लब व पत्रकारांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here