भुसावळ येथे पुन्हा एक खून

भुसावल (प्रतिनिधी गिरिश पवार) – भुसावळ शहरातील खडका चौफुलीवर दिनांक १३ सप्टेंबर २०२० रोजी रात्री १०.०० वाजेच्या दरम्यान शेख अलतमस्त शेख रशीद वय २० राहणार बाबला हॉटेल,कमलाबाई बिल्डींग मधील रहिवाशी यास अज्ञात इसमांची चाकूचे पाच ते सहा सपासप वार केल्याची घटना घडली असून जखमी रुग्णांला उपचारासाठी डॉ.मानवतकर दवाखान्यात आणतांना त्यांचा रस्त्यात मृत्यू झाला.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी बाबासाहेब ठोंबे,सपोनि अनिल मोरे,बाजारपेठ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक यांनी भेट दिली.तसेच डॉ.मानवतकर यांच्या दवाखान्यात नातेवाईक व मित्र मंडळींची गर्दी झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी आर.सी.पी.पथकांच्या कर्मचाऱ्यांना बोलावून काही विपरीत घटना घडू नये यासाठी दवाखान्यातच्या आजूबाजूला बंदोबस्त लावण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here