आरपीआय महाराष्ट्र प्रदेशाध्यपदी प्रभाकर निकम

पुणे (उपसंपादक प्रभाकर निकम) – केंद्रिय मंत्री ना.रामदास आठवले यांच्या आदेशाने रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीया (आठवले) रोजगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा जगताप यांच्या नेतृत्त्वामध्ये तसेच रिपाइं महाराष्ट्र राज्य सचिव हरेशभाई देखणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी प्रभाकर निकम यांची निवड करण्यात आली अाहे
जेष्ठ पँथर,रिपाइं मुंबई सचिव मा.रतन आस्वारे यांच्या प्रमुख उपस्थितमध्ये मा.प्रभाकर निकम यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी रो.आ.महाराष्ट्र सहसचिव मा.कैलास इंगळे,बांद्रा ता.रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे उपाध्यक्ष मा..संतोष बिरवटकर, पिंपरी -चिंचवड रो.आ कार्याध्यक्ष मा.राहुल अलकोंडे तसेच इ.कार्यकर्ते हे उपस्थित होते.
प्रभाकर निकम यांचे सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य असुन रिपब्लिकन पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षापासुन ते कार्यरत आहेत. रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीया (आठवले) या पक्षामध्ये त्यांचे भरिव कार्य असुन त्यांच्या निवडीने पश्चिम महाराष्ट्रातील तरुणांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
शोषित,वंचित,गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी तसेच अन्यायाच्या विरोधात कार्यरत राहणार असल्याचे मा.प्रभाकर निकम यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here