लॉस एंजेलिस – तीन महिन्यांच्या प्रदीर्घ ‘इंटर्व्हल’नंतर हॉलिवूडचे जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुनरागमन होत आहे. जगप्रसिद्ध निर्माता रसेल क्रो यांचा ‘अनहिंज्ड’ हा थरारक ॲक्शनपट पुनरागमनास चालना देण्याची अपेक्षा आहे. या थरारपटानंतर ख्रिस्तोफर नोलन यांचा बहुचर्चित ‘टेनेंट’ प्रदर्शित होईल.
कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिस या दोन ठिकाणांशिवाय प्रमुख साखळी चित्रपटगृह आपले प्रोजेक्टर कार्यान्वित करण्यास सज्ज झाले आहेत. सोशल डिस्टन्सिंग, निर्जंतुकीकरण अशा उपाययोजना लागू असल्या तरी संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असताना बंदिस्त व अंधाऱ्या चित्रपटगृहांत येण्याची प्रेक्षकांची प्रेरणा दोलायमान होऊ शकते.







