पुनर्वसन झालेल्या पाड्यांमध्ये दारुबंदी करण्याची मेधाताई पाटकर यांची मागणी

नर्मदा पुनर्वसन पाड्यांमध्ये अवैध दारू विक्रेत्यांचा हैदोस

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा पुनर्वसन पाड्यांमधील आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधाताई पाटकर यांनी नर्मदा पुनर्वसन झालेल्या पाड्यांमध्ये दारूबंदी करण्यात यावी अशी मागणी अक्कलकुवा पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.
अवैध दारू विक्रीमुळे परिसरातील युवक दारू पिण्याकडे वळले त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून आतापर्यंत 11 जणांनी आत्महत्या केली आहे . तसेच या आत्महत्या केलेल्या मध्ये पाच महिलांचाही समावेश आहे.सतत पोलिसांकडे तक्रार करून देखील या तक्रारीकडे कोणीही लक्ष दिले नसल्याचे निदर्शनास येत आहे.या पाड्यांमध्ये उघड-उघड अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असून त्या विक्रेत्यांवर कुठलीही कारवाई पोलिस प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. अक्कलकुवा हे गुजरात सीमावर्ती भागात असल्यामुळे येथे अवैध दारू मध्यप्रदेशातून गुजरात येथे जात असते. हा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय हा पोलिसांच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही असे मत यावेळी मेधाताईंनी व्यक्त पोलीस प्रशासन या ठिकाणी विक्रेत्यांकडून हप्तेपोलीस प्रशासन या ठिकाणी विक्रेत्यांकडून हप्ते घेत असून त्यांना संरक्षण देत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.आदिवासी भागातील जनतेचा गैरफायदा हे प्रशासन घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.पाण्यामधील लोकांनी एकत्रितपणे दारू विक्रीच्या विरोधात ठराव मंजूर करून तो देखील पोलीस प्रशासनाला सादर केला तरीही त्याचा काहीही उपयोग झालेला दिसून येत नाही.पोलीस विभागाने नव्हे तर एक्साइज डिपार्टमेंट ने देखील या कारवाईकडे लक्ष दिले पाहिजे.नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पाच्या पाण्याखालील क्षेत्रात येणाऱ्या नागरिकांना मेधाताई यांनी शासनाशी वारंवार लढा देऊन शिक्षण, आरोग्य, घरे, जमिनी यांचा अधिकार मिळवून दिला आहे. परंतु दारुमुळे असामाजिक कृत्य घडुन परिवार उध्वस्त होत असेल तर आमच्या लढ्याचा काय फायदा असा प्रश्न उपस्थित केला आहे. या संपूर्ण पाड्यात दारूबंदी करून अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी मेधाताई पाटकर यांनी अक्कलकुवा पोलीस प्रशासनाला केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here