कोणतीही पूर्वसूचना न देता मारहाण करीत
पीएमसी कॉलनीतील पत्रा शेडची घरे केली जमीनदोस्त
पुणे (प्रतिनिधी अजय पवार) – पुण्यातील वाकडेवाडी भागातील पी एम सी काॅलनी येथील पत्रा शेडची घरे महापालिकेतील काही कर्तव्यदक्ष अधिका-यांनी कोणत्याही प्रकारची नोटीस न देता तसेच कोणालाही सदर घरातील वस्तू , भांडी,कपडे इत्यादी सामान बाहेर काढायची संधी न देता निर्दयीपणे महिला-मुलांना मारहाण करुन अतिक्रमण विरोधी पथकाचा गैरवापर करुन ,हि कारवाई केली गेली,
यामधे अधिकाराचा गैरवापर करुन गोरगरीब जनतेला सध्याच्या करोनाच्या घातक रोगराईमधे व एेन पावसाळयात रस्त्यावर आणले आहे , अशा निष्ठूरपणा करणा-या अधिका-यांवर कारवाई करण्यासाठी व संसार उघड्यावर आलेल्या नागरीकांचे कायम स्वरुपात पुनर्वसन करावे या मागणीसाठी माननीय महापौर श्री. मुरलीधर मोहोळ यांना शिवसेना ,रासप व इतर पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले,
याप्रसंगी अतुल दिघे (भारतीय विद्यार्थी सेना पुणे शहरप्रमुख)करुणाताई घाटगे(शिवाजीनगर महिला आघाडी संघटक) मा. नगरसेवक राजाभाऊ साने ,बाळासाहेब सुपेकर, हरिश्चंद्र उकिरडे इ. उपस्थित होते.








