निराधारांचा आधार ठरलेल्या निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान फूड बँकेचे कार्य अविरत

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – शहरातील गरीब निराधार रस्त्यावर राहणाऱ्या आजी आजोबांसाठी निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानची फूड बँक आधार ठरत असून, कोरोना कालावधीतही त्यांचे कार्य अविरतपणे सुरु आहे.
निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानच्या फूड बँकेतर्फे काल (दि.१४) झालेले जेवण वाटपासाठी संजय लक्ष्मण जोशी यांच्या स्मरणार्थ सोहम आणि चाणक्य यांच्याकडून तसेच ज्योति मिसर यांच्याकडून स्व-शंकर वानखेड़े ,विमल वानखेड़े व राजेश वानखेड़े यांच्या स्मरणार्थ व लिनेट वेगस यांच्याकडून त्यांच्या मुलाच्या कु.रॉकी वेगस यांच्या वाढदिवसा निमित्त यांची आर्थिक मदत लाभली. शहरातील रस्त्यावरील निराधार आजी आजोबांना जेवण वाटप करण्यात आले. जेवण वाटप प्रसंगी प्रतिष्ठानचे प्रमोद जावळे, धीरज जावळे व रॉकी वेगस आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here