प्रथमच कोरोनाबाधितांची संख्या आवाक्यात; आज आढळले ४५१ कोरोनाबाधित

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील संशयित कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.१४) प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात ४५१ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित चाळीसगाव तालुक्यात ८२ तर चोपडा तालुक्यात ६७ कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
आज आढळलेल्या ४५१ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर- ५७ , जळगाव ग्रामीण-१९, भुसावळ-४८, अमळनेर-६६, चोपडा-६७, पाचोरा-७, भडगाव-५, धरणगाव-१९, यावल-२२, एरंडोल-२०, जामनेर-१०, रावेर-६, चाळीसगाव-८२, मुक्ताईनगर-१०, बोदवड-६ आणि इतर जिल्ह्यातील ७ असा समावेश आहे.
आज आढळलेल्या ४५१ कोरोनाबाधितांनंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३९ हजार २८७ रूग्ण संख्या झाली आहे. त्यापैकी २८ हजार ४६१ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. कोरोनामुळे आज १९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील एकुण मृतांचा आकडा ९९० वर पोहचला आहे. सद्यस्थितीत ९ हजार ८३६ रूग्ण कोवीड रूग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here