बेळगाव (प्रतिनिधी) – साप पकडण्याचा पेशा जितका आव्हानात्मक आहे त्यापेक्षा जास्त आव्हानात्मक ही गोष्ट आहे की आपल्याला या कामासाठी कोणत्याही वेळी कुठेही जावे लागू शकते. या व्हिडिओत दिसणाऱ्या निर्झरा चिट्टी साडी नेसून पकडत आहेत नाग. एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात काटी घेऊन त्यांनी पकडला नाग.हा व्हिडिओ सोशल मीडियावर होत आहे व्हायरल
एखाद्या ठिकाणी साप आढळल्याची सूचना मिळताचसर्पमित्रांना त्याठिकाणी पोहोचावे लागते. सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यावरून एका सर्पमित्राचे काम किती आव्हानात्मक असू शकते याची आपल्याला कल्पना येईल. या व्हिडिओत एक महिला साडी नेसून साप पकडताना दिसत आहे.
या व्हिडिओत दिसणाऱ्या बेळगावच्या निर्झरा चिट्टी साडी नेसून पकडत आहेत नाग. एका घरात साप आढळला आहे आणि त्याला पकडण्यासाठी सदर महिला तिथे पोहोचली आहे. या महिलेने साडी नेसली आहे. ही महिला निर्झरा चिट्टी आहे ज्यांना एका लग्नसमारंभासाठी जायचे होते. त्यासाठी त्या साडी नेसून तयार होत्या. तेव्हाच त्यांना एका घरात नाग आढळल्याची सूचना मिळाली आणि त्या त्याला पकडण्यासाठी तिथे पोहोचल्या. वेळ कमी असल्याने त्या साडीतच गेल्या आणि नागाला पकडण्यात गुंतल्या.
निर्झरा चिट्टी आणि तिचे पती आनंद चिट्टी हे कर्नाटकच्या बेळगावातील वन्यजीवतज्ञ आहेत. या दांपत्याने स्वतःचे यूट्यूब चॅनेल काढले आहे ज्यावर ते साप वाचवण्याचे त्यांचे व्हिडिओ शेअर करत असतात आणि जनजागृती करतात. जो व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे त्यात निर्झरा चिट्टी साडी नेसून नागाला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (video जुना असला तरी हा व्हिडीओ आता परत व्हायरल होत आहे) यात दिसत आहे की एका हातात मोबाईल घेऊन एका छडीच्या सहाय्याने त्या कपाटात लपून बसलेल्या नागाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.







