जळगाव (संपादक सुनिल पाटील) । १५ नोव्हेंबरपासून जपानमधील टोकीयो येथे सुरु असलेल्या डेफलिम्पिक्समध्ये एअर रायफल शूटिंग या क्रीडा प्रकारात भारताते प्रतिनिधित्व करीत असलेल्या कोमल वाघमारे यांनी वैयक्तिक व सांघिक असे दोन प्रकारात ब्रॉन्झ पदक जिंकले आहे. या यशाबद्दल कोमलचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोमल ही एसएनडीटी वूमन यूनिवर्सिटी मुंबई येथे शेवटच्या वर्षाला सायकॉलॉजी विषयात मास्टर्स करीत आहे तसेच लक्ष्य शूटिंग अकॅडमी पनवेल येथे रायफल शूटिंगची प्रॅक्टिस करीत आहे. कोमल वाघमारे या नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदार मिलिंद चिंतामण वाघमारे यांची कन्या असून, बुलंद पोलीस टाइम्सतर्फे तिला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.








