शहादा (विजय निकम)- तालुक्यातील मामाचे मोहिदे येथे शेतकऱ्यांना शेती विषयक सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी गावोगावी जाऊन कृषिदूत म्हणून कार्य करीत आहे.
सध्या लॉकडाऊनमध्ये सर्वं शैक्षिणिक संस्था,शाळा महाविद्यालय बंद असल्यामुळे ऑनलाईन वर्ग घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालय ,शहादा येथिल अंतिम वर्षातील विध्यार्थ्यांकडुन प्रात्यक्षिकाचा भाग म्हणून ग्रामीणकृषी कार्यानुभव अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. अक्षय पाटील विद्यार्थ्यांने मामाचे मोहिदे येथे शेतकरी विनोद पाटील,विवेक पाटील , तुषार पाटील व इतर शेतकरीबंधू यांना कृषीविषयक विविध उपलब्ध असलेल ऍप्लिकेशन(अँप्स)बद्द्ल सविस्तर माहिती देऊन प्रतक्ष प्रत्यक्षिक करून दाखविले. शेतकऱ्यांच्या उपत्नात व प्रगती कशी वाढ होईल. तसेच शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनाची सखोलपणे माहीती दिली . यावेळी अनेक शेतकरी हे सुरक्षित अंतर ठेवून उपस्थित होते.यशस्वीत्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एल.पटेलसर व प्रा. संदिप पाटील, प्रा.चंद्रशेखर पाटील ,प्रा. सचिन चौधरी व इतर प्राचार्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.







