आज आढळले ७४३ कोरोनाबाधित तर ७२३ रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वी मात
जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आज (दि.१६) जिल्ह्यात ७४३ कोरोनाबाधित आढळून आले आहे. आज आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहरासह चाळीसगाव, चोपडा व जामनेर तालुक्यात सर्वाधिक आहे.
आज आढळलेल्या ७४३ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर-२००, जळगाव ग्रामीण-२५, भुसावळ-४३, अमळनेर-५६, चोपडा-६५, पाचोरा-४, भडगाव-४६, धरणगाव-२३, यावल-१४, एरंडोल-४७, जामनेर-६१, रावेर-२७, पारोळा-३४, चाळीसगाव-६६, मुक्ताईनगर-१८, बोदवड-०९ व दुसर्या जिल्ह्यांमधील ७ असा समावेश आहे.
आज आलेल्या अहवालानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४० हजार ९०८ झाली असून, त्यातील २९ हजार ८९१ रूग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. कोरोनामुळे आज १९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १०२७ आहे. सद्यस्थितीत ९ हजार ९९० रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.







